नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी

नमस्कार, राज्यातील जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये, अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी साठी, 24 जुलै 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर, 24 जुलै 2023 रोजी काढण्यात आलेला आहे.


यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून, जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या 2019चे जे कर्ज आहे, ते माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर पूर परिस्थिती, अतिवृष्टी यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी मार्फत बाधित शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेले पीक कर्ज, या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, आणि त्याच्यासाठी आत्ता पर्यंत 25 कोटी 12 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेले आहे.

सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचा सहभाग होता, आणि या अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी (shetkari karjmafi) करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून 50 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामुळे जुलै ऑगस्ट 2019 च्या मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी (karj mafi 2019) हे सहाय्य दिले जाणार आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारच महत्त्वाचा जीआर आज राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे कर्ज माफी karjmafi पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

कर्जमाफी GR :

हा जीआर आपण या संकेतस्थळावर देखील पाहू शकता.

आणखी वाचा: 1) या 7 विशेष सहाय्य योजना सर्वांना माहीत असल्याच पाहिजेत, एकदा वाचा व जवळच्यांना फायदा करून द्या

Snehal Phad is a very good Marathi author for 24NewsMarathi. With extensive experience and a passion for writing, Snehal's articles are known for their clarity and engaging style. She possess a comprehensive understanding of current affairs and stay updated with emerging trends in journalism. Snehal's love for literature enriches their writing, and their dedication to accurate news coverage has established them as a trusted source.

Leave a Comment