महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथील संशोधन प्रकल्पामध्ये संगीतलेली ही खरबूज लागवड तंत्रज्ञान माहिती आहे. ही माहिती वेळ देऊन पूर्ण वाचावी. खरबूज in english: MuskMelon
खरबूज हे पीक पूर्वी नदी पात्रांतून वाळूमध्येच घेतले जात होते. पण आता हे शेतात ओलिताखाली देखील घेतले जाते. हे पीक सर्वसाधारण सुपीक व निचरा असलेल्या जमिनीत येऊ शकते. भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे व उष्ण हवामान आणि पाणीपुरवठा असल्यास हे पीक उत्तम येऊ शकते.
पिकाचा कालावधी सर्वसाधारणपणे जातीनुसार ३ ते ४ महिन्याचा असतो. खरबूज लागवड कोणत्या महिन्यात करावी याचे उत्तर खरबुजे साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात बाजारात येतात. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये हिरवा, पिवळसर केशरी व पांढरा गर असलेल्या फळांना मागणी असते. फळांची काढणी एकदम न करता २ ते ३ टप्प्यात करावी. या पिकाच्या सुधारीत जातीपासून २० ते २५ टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते.
“खरबूज लागवड” पिकामध्ये विविध संस्थानी संशोधन करुन अत्यंत स्वादिष्ट, भरपूर गराच्या, गोड व कमीत कमी बियांच्या व रोगप्रतिकारक जाती विकसित केलेल्या आहेत.
सुधारीत जातींची खरबूज लागवड माहिती:
१) पूसा सरबती:
फळांचा आकार गोल, किंचित लांबट, साल खडबडीत जाळीयुक्त आणि मधून मधून हिरवे पट्टे, गर नारिंगी रंगाचा व जाड, आतली बियांची पोकळी फारच छोटी असते. हेक्टरी उत्पादन १६० ते १८० क्विटल मिळते.
२) हरा मधू:
ही उशिरा येणारी जात आहे. फळांचा आकार गोल, वरची साल पांढरी व त्यावर खोलगट हिरवे पट्टे, गर फिकट हिरव्या रंगाचा व गोड असतो. हेक्टरी उत्पादन १२५ किंवटल मिळते.
३) दुर्गापूरा मधू:
मध्यम अवधीत तयार होणारी ही जात राजस्थानच्या कृषि खात्याने शिफारस केली आहे. फळ लांबट गोल, लहान, साल फिकट हिरव्या रंगाची व त्यावर हिरव्या रंगाच्या धारी असतात. गर फिकट हिरव्या रंगाचा व गोड असतो.
४) अरका राजहंस:
ही लवकर येणारी जात बंगलोर येथील संस्थेने विकसति केली आहे. फळ मध्यम ते मोठे साल मळकट पांढरी बारीक जाळीयुक्त, गर भरपूर, पांढरा, अत्यंत गोड, साठवणीत उत्तम राहते. भुरी रोगाला प्रतिकारक हेक्टरी उत्पादन २८५ ते ३२० क्विटल मिळते.
५) अरका जीत:
ही लवकर येणारी जात (९० दिवस) बंगलोर येथील संस्थेने विकसित केली आहे. फळ लहान (४०० ते ८०० ग्रॅम), गोल, आकर्षक, पिवळ्या रंगाचे, अत्यंत गोड असून त्यात ‘क’ जीवनसत्व अधिक प्रमाणात आहे..
हवामान:
या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपुर सुर्यप्रकाश अत्यंत पोषक आहे. वेलीच्या वाढीसाठी २४ ते २६ अंश सें.ग्रे. तापमान फारच उपयुक्त असते. तापमान २१ अंश सें.ग्रे. पेक्षा कमी असल्यास बियांची उगवण होत नाही. तसेच तापमान ४ ते ५ अंश से.ग्रे. च्या खाली गेल्यास बेलीची वाढ खुंटते. थंडी व धुके या
पिकास मानवत नाही. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास पानांवरील रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच कमी तापमानाला भुरी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो.
जमीन खरबुजासाठी रेताड, मध्यम काळी, पोयट्याची किंवा गाळाची, उत्तम निचरा असलेली जमीन चांगली असते. निचरा होणाऱ्या मध्यम अगर भारी जमिनीत हे पीक उत्तम येते.
खरबूज बियांचे प्रमाण:
खरबुजाचे सुमारे दीड ते दोन किलो बी एका हेक्टरसाठी पुरेसे होते. बी रात्रभर भिजत घालून लावल्यास उगवण चांगली होते. बी सुमारे दीड ते दोन सें.मी. खोल ओलसर जमिनीत (३ ते ४ बिया) टोकून लावावे. विरळणी करून शेवटी प्रत्येक ठिकाणी दोन वेली ठेवाव्यात.
लागवडीचे अंतर जातीपरत्वे दोन ओळीत १.५ ते २.५ मीटर व दोन वेलांत ०.५० ते ०.७५ मीटर अंतर ठेवावे.
खरबूज लागवड:
खरबूज लागवड बिया कायम जागेवर टोकून करतात कारण याची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. लागवड डिसेंबरपासून मार्चपर्यंत केली जाते. नदीच्या पात्रात लागवड, नदीचे पाणी ओसरल्याबरोबर, सहसा लवकर म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये करतात. काही ठिकाणी फेब्रुवारी पर्यंत लागवड चालू असते. महाराष्ट्रात शक्यतो जानेवारी- फेब्रुवारी मध्ये लागवड केली जाते. लागवड खालील पध्दतीने करतात.
खरबुज लागवड आळे पध्दत: ठरावीक अंतरावर आळे करुन त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३ ते ४ बिया टोकतात.
सरी-वरंबा पध्दत: रिजरने ठरावीक अंतरावर सऱ्या पाडून वरच्यांच्या बगलेत प्रत्येक ठिकाणी ३ ते ४ बिया टोकून लावतात.
रुंद गादीवाफ्याची पध्दत: या पध्दतीत लागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूना करतात. हेतू हा की, वेल गादीवाफ्यावर पसरावा व फळांना पाणी लागून ती खराब होऊ नयेत. या साठी ३ ते ४ मीटर अंतरावर सऱ्या पाडून बगलेत दोन्ही बाजूंनी ७५ ते ९० सें.मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोकतात.
खरबूज खत व पाणी व्यवस्थापन: पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी १५ ते २० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे. पिकासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो पालाश व ५० किलो स्फूरद द्यावे. संपूर्ण स्फूरद, पालाश व निम्मे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे व नत्रांचा निम्मा हप्ता वेल शेंडा धरु लागल्यावर तीन समान हप्त्यात ३०, ४५ व ६० दिवसांनी विभागून द्यावा.
खरबूज पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. मध्यम व भारी जमिनीत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये १० दिवसाच्या अंतराने तर मार्च – एप्रिल या काळात ७ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. हलकी जमीन असेल तर लवकर पाणी द्यावे. फळधारणेच्या काळात पाण्याचा ताण पडू देवू नये.
खरबूज आंतरमशागत: नांगे भरणे, वेलाला दिशा देणे, सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण करणे व पीक तीन ते चार आठवड्यांचे झाल्यानंतर रिंग पध्दतीने नत्र देणे ही आंतरमशागतीची कामे वेळच्या वेळी करणे फार महत्वाचे असते. उगवण होताच वेलांना वळण देऊन मोकळ्या जागेकडे वळवावे. हे काम वेल ७ ते ९ पानांवर असताना करावे. हे काम वेल जास्त लांब झाल्यावर करता येत नाही, कारण वेलीला इजा होण्याचा संभव असतो. खरबुजाचे वेल ३५ ते ४० दिवसांत भरपूर वाढतात. त्यानंतर वेलींची जास्त प्रमाणात हलवा हलव करु नये कारण वेल अत्यंत नाजूक असतात.
पीक संरक्षण
खरबुजावर प्रामुख्याने केवडा किंवा डावनी मिलड्यू, भुरी किंवा पावडरी मिलडयू, कवडी किंवा अन्थॅकनोज, करपा, मर हे बुरशीजन्य आणि विषाणूजन्य मोझॅक, बड नेक्रॉसीस हे रोग आढळतात तर फळमाशी, लाल भुगेरे व लीफ मायनर या किडी आढळून येतात.
खरबूज रोगनियंत्रणाचे उपाय
खरबूज लागवड पूर्वी इमिडोक्लोप्रिड ५ ग्रॅम + कार्बेन्डॅझिम ( बाविस्टीन) २ ग्रॅम किंवा कॅप्टन २ ग्रॅम प्रति किलो बियाने या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी.
१) केवडा : पानाच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके दिसतात. हे ठिपके पानावर पसरतात, पाने वाळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा मेटॅलॅक्झील एम. झेड. ७२, २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा फोसीटीएल २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
२) करपा आणि पानावरील ठिपके: २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा २५ ग्रॅम क्लोरोथॅलोनील किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड प्रति १० लि. पाण्यात मिसळुन आलटुन पालटुन फवारणी करावी.
३) भुरी: भुरीसाठी कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १० मिली. यापैकी कोणतेही एक औषध १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच फवारावे आणि नंतर दर पंधरा दिवसांनी यांपैकी एक औषध आलटून पालटून साधारणपणे २ ते ३ वेळा फवारावे. या पिकावर सामान्यतः कुठल्याही प्रकारचे गंधक वापरु नये.
४) मर: मर रोगाचे नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी २.५ ते ३ किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखत आणि निंबोळी पेंडीत मिसळून लागवडीच्या ठिकाणी जमिनीत मिसळावी किंवा रोगाची लक्षणे दिसताच कॅप्टन ३० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड (ब्लायटॉक्स ) ३० ग्रॅम १० लिटर पाण्यातून झाडाच्या मुळा भोवती ओतावे. विषाणूजन्य रोगाचे नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व किटकनाशकांची फवारणी करावी.
खरबूज किडनियत्रंणाचे उपाय
१) फुलकिडे, मावा : खरबूज लागवड नंतर पिकास १ ते ३ पाने दिसू लागताच आणि फळे येण्यापूर्वी रस शोषणाऱ्या किडीसाठी एक किंवा दोन कीडनाशकाची फवारणी १० ते १५ दिवसाचे अंतराने २ ते ३ वेळा करावी. डायमेथोएट १० मिली किंवा इमिडॅक्लोप्रीड ४ मिली. किंवा थायमेथेंक्झाम ४ ग्रॅम १० लिटर पाण्यातुन फवारणी १० ते १५ दिवसाचे अंतराने किंवा गरजेनुसार करावी.
२) लाल कोळी: लाल कोळी या किडींसाठी फेनपायरॉक्झिमेट ५ इसी. १० मिली. किंवा फेनाक्झाक्विन १० इसी २५ मिली प्रती १० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
३) नाग अळी: निंबोळी अर्क ५ टक्के किंवा इथिऑन + सायपरमेथ्रिन (संयुक्त कीटक नाशके) २० मिली प्रति १० लि पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
४) पाने व फळे खाणारी अळी: किडींचे प्रमाण ५ टक्के पेक्षा जास्त असेल तर पुढील औषधांची फवारणी १० ते १५ दिवसाच्या अंतराने किंवा गरजेनुसार करावी. निंबोळी अर्क ५ टक्के तसेच नविन किडनाशकामध्ये प्रयोगातुन परिणामकारक असलेले सायफरमेथ्रिन १० इसी. १० मिली. किंवा क्लोरपायरीफॉस २० मिली १० लिटर पाण्यातुन मिसळुन फवारणी करावी.
५) फळमाशी: एकरी क्युल्युरचे पाच सापळे लावावेत.
६) तांबडे भुंगेरे: डायक्लोरोफॉस ७६ टक्के ईसी. १० मिली. किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी. २० मिली. १० लीटर पाण्यातून फवारावे.
खरबूज काढणी व खरबूज उत्पादन :
खरबुजाचे फळ पिकले म्हणजे थोडासा धक्का लागला तरी ते देठापासून वेगळे होते. फळ तयार झाल्याचे ते निश्चित लक्षण समजावे. सालीवर जाळी असलेल्या जातीत जाळीच्या मधली जागा पिवळसर झाली की फळ पिकल्याची खूण समजावी. खरबुज पिकल्यानंतर विशिष्ट प्रकारचा एक वास सुटतो. या चिन्हावरुन फळे काढणी सुरु करावी. फक्त पक्व फळेच काढावीत. सर्वसाधारणपणे एका वेलांपासून सुधारीत जातीत दोन फळे तर संकरीत जातीत ३ ते ४ फळे सरासरी येतात. यामध्ये जातीपरत्वे फळांची संख्या कमी-जास्त असू शकते. फळे तयार होताच काढणी करावी. काढणीनंतर फळांची प्रतवारी करावी. खरबुज या पिकाचा कालावधी ३ ते ४ महिन्याचा असतो. खरबुजे साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात बाजारात येतात. फळांची काढणी एकदम न करता २ ते ३ टप्प्यात करावी. या पिकाच्या सुधारीत जातीपासून सर्वसाधारणपणे २० ते २५ टन प्रति हेक्टरी असे उत्पादन मिळू शकते.
आणखी वाचा: Tomato Virus : महाराष्ट्रात टोमॅटो पिकाला लागत असलेले हे दोन ‘मोझॅक’ विषाणू : कारणे, लक्षणे, नियंत्रण आणि उपाय
खरबूज लागवड कधी करावी?
खरबूज लागवड डिसेंबरपासून मार्चपर्यंत केली जाते. नदीच्या पात्रात लागवड, नदीचे पाणी ओसरल्याबरोबर, सहसा लवकर म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये करतात. काही ठिकाणी फेब्रुवारी पर्यंत लागवड चालू असते. महाराष्ट्रात शक्यतो जानेवारी- फेब्रुवारी मध्ये लागवड केली जाते.
तुम्ही खरबूज कसे लावाल?
लागवड बिया कायम जागेवर टोकून करतात कारण याची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. आळे पध्दत: ठरावीक अंतरावर आळे करुन त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३ ते ४ बिया टोकतात.
सरी-वरंबा पध्दत: रिजरने ठरावीक अंतरावर सऱ्या पाडून वरच्यांच्या बगलेत प्रत्येक ठिकाणी ३ ते ४ बिया टोकून लावतात.
रुंद गादीवाफ्याची पध्दत: या पध्दतीत लागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूना करतात. या साठी ३ ते ४ मीटर अंतरावर सऱ्या पाडून बगलेत दोन्ही बाजूंनी ७५ ते ९० सें.मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोकतात.
खरबूज वाढण्यास किती वेळ लागतो?
पिकाचा कालावधी सर्वसाधारणपणे जातीनुसार ३ ते ४ महिन्याचा असतो. खरबुजे साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात बाजारात येतात. फळांची काढणी एकदम न करता २ ते ३ टप्प्यात करावी.
घरी खरबूज बियाणे कसे जतन करावे?
बिया काढा व पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवा.
बिया एका स्वच्छ कागदाच्या टॉवेलवर किंवा कापडावर ठेवा आणि एका थरात पसरवा.
सुमारे एक किंवा दोन आठवडे बिया पूर्णपणे कोरडे होऊ द्या. ते थेट सूर्यप्रकाशापासून दूर हवेशीर क्षेत्रात असल्याची खात्री करा.
बिया पूर्णपणे कोरड्या झाल्या की, त्यांना थंड, कोरड्या जागी हवाबंद डब्यात किंवा सीलबंद प्लास्टिकच्या पिशवीत साठवा.
बिया एका डार्क आणि थंड ठिकाणी ठेवा, जसे की पेंट्री किंवा रेफ्रिजरेटर.
खरबूज बाजार भाव किती असतात?
जुलै 2023 – खरबूजाचे सरासरी बाजार दर 1600/क्विंटल, ₹२५००/क्विंटल, 3000/क्विंटल यांच्या आसपास आहेत.
खरबूज खाण्याचे फायदे?
हायड्रेशन
पोषक तत्वांनी युक्त
वजन व्यवस्थापन
डोळ्यांचे आरोग्य
पाचक आरोग्य
अँटिऑक्सिडंट गुणधर्म
Snehal Phad is a very good Marathi author for 24NewsMarathi. With extensive experience and a passion for writing, Snehal’s articles are known for their clarity and engaging style. She possess a comprehensive understanding of current affairs and stay updated with emerging trends in journalism. Snehal’s love for literature enriches their writing, and their dedication to accurate news coverage has established them as a trusted source.