प्रसूतीदरम्यान त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. मात्र मुलाला आणि कॉलेजचे क्लासेस एकाच वेळी चालवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
आईचे प्रेम व माया प्रत्येकाला दिसून येते; परंतु वडिलांचे प्रेम मात्र कोणाला जाणवत नाही. जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन जगणारा बाप स्वतःच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवत असतो. तो दिवसभर कितीही थकलेला असेना घरी आल्यावर तो आपल्या मुलांना प्रेमाने आपल्या कुशीत घेताना दिसतो. वडिलांची तुलना आईशी करता येत नाही हे नक्की. शेवटी आई ती आईच असते; पण मुलांच्या आयुष्यात वडिलांची भूमिकाही तितकीच मोलाची असते ते या फोटो वरुण तुमालाही जाणवेल.
फोटोमध्ये बघू शकता की, मुलाला आपल्या छातीजवळ घट्ट बांधून एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. या बाबत लोक असे सांगतात की, ही व्यक्ती पेशाने शिक्षक आहे. मुलाला जन्म देत असताना त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. उदरनिर्वाहासाठी नोकरी करणे भागच होते. म्हणून त्यांनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी नोकरी सोडली नाही, पण आपल्या मुलाच्या संगोपनाकडेही दुर्लक्षही केले नाही.
मुलाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम मिळणे महत्वाचे असते. पालकांपैकी एकाने तरी बाळाला वेळ देणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीच्या कुटुंबात इतर व्यक्ति असू शकतात; पण बाप हा बापच असतो. त्यात मुलाच्या डोक्यावरून आईची सावली गेली असेल तर, वडिलांची जबाबदारी आणखीनच वाढते.
आईचा जीव मुलांमध्ये जास्त गुंतलेला असतो, तर वडील सतत मुलांचे भविष्य ध्यानात घेऊन चिंतेत असतात.
हा फोटो जो “लेकाला छातीला बांधून शाळेत शिकवतोय हा शिक्षक” सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रत्येक जण या व्यक्तिला रिअल हीरो म्हणत आहेत. हा केवळ दिखावा असल्याचे अनेक जण म्हणत आहेत. मात्र, हा फोटो यापूर्वीही व्हायरल झाला होता, तो आता पुन्हा एकदा तो मीडियावर चर्चेत आला आहे.
Snehal Phad is a very good Marathi author for 24NewsMarathi. With extensive experience and a passion for writing, Snehal’s articles are known for their clarity and engaging style. She possess a comprehensive understanding of current affairs and stay updated with emerging trends in journalism. Snehal’s love for literature enriches their writing, and their dedication to accurate news coverage has established them as a trusted source.